‘TV9 मराठी’ इम्पॅक्ट ! बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग, नंदुरबारच्या दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा
VIDEO | तळोदा - धडगाव या मार्गावर असलेल्या चांदशैली घाटातील दरडी हटवण्यास सुरूवात, 'TV9 मराठी'ने बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाकडून दखल
जितेंद्र बैसाणे, नंदुरबार, 7 ऑगस्ट 2023 | नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणाहून सातपुड्याचा दुर्गम भागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून तळोदा – धडगाव या मार्गाची ओळख आहे. या मार्गावर असलेल्या चांदशैली घाटामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळत आहे तर त्यासोबत पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी डोंगरातून माती रस्त्यावर येत होती, याची बातमी ‘TV9 मराठी’ ने दाखवल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. यानंतर चांदशैली घाटात प्रशासनाच्या वतीने घाटात संरक्षण भिंत आणि दरडी काढण्याचे काम सुरू केले. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचे प्रवाह डोंगरावरून खाली येत होते, त्या ठिकाणीही मोठ्या संरक्षण भिंती उभारल्या जाणार आहे. यासाठी महिनाभर हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असल्याने या रस्त्यावरील वाहतूक येत्या काळात सुकर होणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील गावातील नागरिकांनी मोठा दिलासा मिळाला असून ‘TV9 मराठी’ चे त्यांनी आभारही मानले आहेत.