Nandurbar ZP Results | नंदुरबारमध्ये शिवसेना भाजपमध्ये थेट लढत, मतमोजणी केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील रिक्त झालेल्या 11 जिल्हा परिषद सदस्य आणि 14 पंचायत समिती सदस्यांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये कुठे ही प्रचारात ओबीसी आरक्षणाचा मुदा प्रभावी दिसला नाही.स्थानिक मुद्यावर ही निवडणुकीचा प्रचार झाला. जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या विशेषत काँग्रेस, भाजप, शिवसेना नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली होती.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील रिक्त झालेल्या 11 जिल्हा परिषद सदस्य आणि 14 पंचायत समिती सदस्यांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये कुठे ही प्रचारात ओबीसी आरक्षणाचा मुदा प्रभावी दिसला नाही.स्थानिक मुद्यावर ही निवडणुकीचा प्रचार झाला. जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या विशेषत काँग्रेस, भाजप, शिवसेना नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी आपली ताकद पणाला लावलेली दिसून आली.
भाजप नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित यांना कोडदा गटातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्या सोबत डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतण्या पंकज गावित यांना कोपरली गटातून उमेदवारी देण्यात आलेली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची बहिणीला खापर गटातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यासबत शिवसेना नेते आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी याचा मुलगा राम रघुवंशी यांना कोपर्ली गटातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. यांच्या लढतीकडं नंदुरबारचं लक्ष लागलं आहे.