काय नॉर्मल माणूस वाटतोय का तुम्हाला? नारायण राणेंचा सवाल

| Updated on: Aug 24, 2021 | 12:19 PM

मी काय नॉर्मल माणूस वाटलो आहे का? कुणाचंही नाव घेऊन माझी बदनामी करायला घेतली तर त्यांच्याआधी माझा गुन्हा तुमच्याविरोधात सुरू होईल. कालपासून टीव्ही चॅनल सारखं हेच दाखवत आहेत.”

नारायण राणे म्हणाले, “माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा आणि मग टीव्हीवर दाखवा, नाही तर चॅनलविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा नसताना पथक निघालंय, अटक होणार असं म्हणत आहेत. मी काय नॉर्मल माणूस वाटलो आहे का? कुणाचंही नाव घेऊन माझी बदनामी करायला घेतली तर त्यांच्याआधी माझा गुन्हा तुमच्याविरोधात सुरू होईल. कालपासून टीव्ही चॅनल सारखं हेच दाखवत आहेत.”

“मी बातमीवर विश्वास ठेवणार नाही. मला माहिती मिळाल्यावर आम्ही समर्थ आहोत. दगड मारुन जाणं हा पुरुषार्थ नाही. आम्ही पाहू, काय पुरुषार्थ आहे. ज्यावेळेला शिवसेना भवन फोडू असं लाड म्हणाल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले थोबाड फोडू, हा क्राईम नाही का? त्यावेळी का गुन्हा नाही?” असा सवाल नारायण राणेंनी विचारला.

15 ऑगस्ट हा वर्धापन दिन हा माहिती नाही मुख्यमंत्री असताना, मी म्हणालो त्याने मागे सेक्रेटरीला विचारावं. आणि त्यावेळी मी असतो तर.. असतो तर हा क्राईम नाही. मी आता कानफाड फोडीन हा क्राईम आहे. मी पण कॅबिनेट मंत्री आहे देशाचा. देशाचा अमृत महोत्सव माहिती नाही हा राष्ट्रद्रोह आहे, असा घणाघात नारायण राणेंनी केला.

 

राज्यात यांचं सरकार म्हणून कारवाई, आमचंही वर सरकार पाहून घेऊ : नारायण राणे
Narayan Rane | चिपळूणमध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने