Narayan Rane | अज्ञातवासात जायची आम्हाला गरज नाही, नितेश राणे सिंधुदुर्गातच आहेत – नारायण राणे

| Updated on: Dec 27, 2021 | 12:55 PM

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार करण्यात आल्याचं नारायण राणे म्हणाले. त्या प्रकरणी आम्ही कोर्टात जाऊ असं, नारायण राणे म्हणाले

ओबीसी आरक्षणासदंर्भात आज निर्णय येईल, त्यापूर्वी मी कोणतंही वक्तव्य करणार नाही, असं नारायण राणे म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार करण्यात आल्याचं नारायण राणे म्हणाले. त्या प्रकरणी आम्ही कोर्टात जाऊ असं, नारायण राणे म्हणाले. नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचं आहे ते करावं. ज्यांना मारहाण झाल्याचं सांगत आहेत त्यांना नितेश राणे यांच्याकडून कोणतीही मारहाण झाली नाही, असं नारायण राणे म्हणाले. सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून जे काही करता येईल ते विदर्भासाठी करणार असल्याचं नारायण राणे म्हणाले.

Aaditya Thackeray on CM | मुख्यमंत्री अधिवेशनात येण्यावर प्रश्नचिन्ह, आदित्य ठाकरे म्हणाले…
VIDEO : Assembly Session | ‘म्याव-म्याव; प्रकरणाचे सभागृहात पडसाद, सेनेकडून नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी