‘घरात बसून काम न केलेला एकमेव नेता’, भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा
VIDEO | घरात बसून काम न केलेला नेता आतापर्यंत एकच झाला उद्धव ठाकरे, भाजप नेत्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर थेट केला हल्लाबोल
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने स्नेहबंध हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध निवेदक अमोल परचुरे यांनी नारायण राणे यांची मुलाखत घेतली. यावेळी नारायण राणे यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर आपल्या शैलीत सडेतोड उत्तर दिली. एका प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर न चुकता थेट नाव घेत निशाणा साधला आहे. घरात बसून काम न केलेला नेता आतापर्यंत एकच झाला उद्धव ठाकरे अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच घरात बसून काम करणारा नेता हा रेकॉर्ड आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव घातलं पाहिजे. असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
Published on: Apr 11, 2023 07:27 PM