‘टीव टीव करत एक उंदीर फिरतोय महाराष्ट्रभर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने!’ नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यात दौरा करण्याचं ठरवलं होता. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, असा दौरा केला देखील होता. या दौऱ्यावरुन विरोधकांनी टीकादेखील केली होती.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टोला लगावला आहे. शिवसेनेत (Shiv sena Politics) झालेल्या बंडाळीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यावर नारायण राणे यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. टीव टीव करत एक उंदीर फिरतोय महाराष्ट्रभर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने, असं म्हणत नारायण राणे यांनी टीका केली आहे. शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यात दौरा करण्याचं ठरवलं होता. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, असा दौरा केला देखील होता. या दौऱ्यावरुन विरोधकांनी टीकादेखील केली होती. दरम्यान, आता नारायण राणे यांनीही आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन त्यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे.