Narayan Rane | 9ऑक्टोबरला चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री आले तर स्वागतच करू : नारायण राणे
येत्या 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले तर त्यांचं स्वागतच करु, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
मुंबई : येत्या 9 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले तर त्यांचं स्वागतच करु, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. यापूर्वी उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उपस्थित असावेत असे काही नाही, असे राणे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर आता नारायण राणे यांचे सूर बदलले असल्याच म्हटले जात आहे.