Deepak Kesarkar| माझ्यावर टीका केल्याशिवाय राणेंचे राजकारण पूर्ण होत नाही- केसरकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल सावंतवाडीत कार्यकर्ता बैठकीत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर घणाघाती टीका करताना ते शेमडे आमदार असून मंत्री असताना विधानसभेत काहीचं पर्फोमस् दाखवू शकेल नाहीत, अशी टीका केली होती. या टीकेला दिपक केसरकर यांनी राणेंना सडेतोड उत्तर दिलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल सावंतवाडीत कार्यकर्ता बैठकीत सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर घणाघाती टीका करताना ते शेमडे आमदार असून मंत्री असताना विधानसभेत काहीचं पर्फोमस् दाखवू शकेल नाहीत, अशी टीका केली होती. या टीकेला दिपक केसरकर यांनी राणेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. नारायण राणेंच सिंहासन मी हलवल याची कायम सल त्यांच्या मनात आहे त्यामुळे ते सावंतवाडीत येऊन माझ्यावर टीका करतात.
माझ्या वर टीका केल्यावर शिवाय त्यांच राजकारण चालत नाही. ते नुसतं बोलतात कामं करत नाहीत. आणि मी बोलून दाखवत नाही आणि ज्यावेळेला बोलतो तेव्हा काय होत हे तुम्हाला माहीत आहे तुमचं सिंहासन हल्ल कोणा मुळे हे तुम्हाला माहीत आहे आणि त्याचीच सल तुमच्या मनात आहे हे मला माहीत आहे. विधान परिषदेत जे जे घडलं ते रेकॉर्डेड आहे. पाच वर्षे मी राज्याचा अर्थसंकल्प विधान परिषदेत सादर केला आणि विरोधकांच्या प्रश्नाना येवढी समर्पक उत्तर दिली की कधीही राईट टू रिप्लाय त्यांना पुन्हा वापरावा लागला नाही एवढ अभ्यास पुर्ण काम केलं पण त्याचा गवगवा कधी केला नाही. त्यामुळे ज्या जनतेने तुम्हाला एवढी वर्ष प्रेम दिलं त्यांच्याशी खरं बोलण्याचं तरी सौजन्य दाखवा असा पलटवार केसरकर यांनी राणेवंर केला आहे.