Narayan Rane | योगींचं थोबाड फोडण्याची भाषा योग्य होती का ? नारायण राणेंचा सवाल
महाड कोर्टाने जामीन दिल्यानंतर राणेंनी आज पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानशिलात देण्याच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. राणेंना अटक केल्यानंतर महाड कोर्टाने त्यांना जामीन दिला. ज्यानंतर राणेंनी आज पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले.
पत्रकार परिषदेत बोलताना राणेंनी उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेवर जोरदार टीका केली. “1 ऑगस्टला बीडीडी चाळीचं पूलबांधणीचा कार्यक्रम होता. त्याअगोदर आमचे आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवन बद्दल काहीतरी वक्तव्य केलं होतं. आमच्या महिलांवर हात टाकला तर, असं बोलले होते. मी जे बोललो होतो आपल्या देशाला अभिमान नसेल त्याला राष्ट्री सण माहित नसतात. देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे मला सहन झालं नाही. त्यामुळे मी ते बोललो. असं राणे म्हणाले.
Published on: Aug 25, 2021 05:14 PM