Narayan Rane | भाजपचं सरकार येणार, ठाकरे सरकारचं लाईफ जास्त नाही; नारायण राणेंचा दावा

| Updated on: Nov 26, 2021 | 2:32 PM

नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना मार्चमध्ये महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्याचा  दावा केला आहे. राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत असल्याचे राणे म्हणाले.

नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना मार्चमध्ये महाराष्ट्रात भाजपचं सरकार येण्याचा  दावा केला आहे. राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असं राणे म्हणाले.

माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या आताच सांगणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार आणण्यासाठीच्या काही करायचं असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही. पण आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही, असंही ते म्हणाले.

Anil Parab on Strike | कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसक्षण देणार, अनिल परब यांची माहिती
Virat kohli : विराट कोहलीचा आणि युजवेंद्र चहलच्या बायकोचा हा नाद खुळा डान्स पहा, व्हिडिओ तुफान व्हायरल