Narayan Rane Live | ही आमची माणसं आहेत, त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही : नारायण राणे

| Updated on: Jul 25, 2021 | 4:55 PM

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली.

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत येऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी नारायण राणे यांना गराडा घातला आणि आपलं गाऱ्हाणं मांडलं. दादा, तुम्ही कोकणासाठी दैवत आहात. तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता, असं व्यापारी म्हणाले. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी बोलताना नारायण  ही आमची माणसं आहेत, त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही, असं ते म्हणाले.

मी शेतकरी कुटुंबातील मुलगा, कारखान्याचा संचालक होईन असं वाटलं नव्हतं, दत्तात्रय भरणेंनी सांगितला राजकीय प्रवास
Pune | भोरमध्ये कोंढरी गावाजवळ दरड कोसळली, प्रशासनाकडून संपूर्ण गावाचं स्थलांतर