Cabinet Expansion | नारायण राणे केंद्रीय मंत्रिपदी विराजमान, थेट Live
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ फेरबदल आणि मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला महत्वाची खाती आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आलं.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. रात्री खातेवाटप जाहीर केल्यानंतर राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे खातं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे होतं. गडकरींकडील हे अतिरिक्त खातं काढून नारायण राणे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आलीय.