Narayan Rane | ‘सत्यमेव जयते’, जामीन मिळताच नारायण राणे यांचं ट्विट
जामीन मिळताच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्विट केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर रात्री महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर नारायण राणे यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्विट केलं.
जामीन मिळताच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर रात्री महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर नारायण राणे यांनी ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट केलं.
15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नारायण राणे यांना जामीन देण्यात आलाय. मात्र, 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे. त्यानंतर रात्री 12 च्या सुमारास राणे कोर्टाच्या बाहेर पडले. मात्र त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधत राणेंच्या पुढील कार्यक्रमाची आणि जनआशीर्वाद यात्रेबाबत माहिती दिली.