नारायण राणेंवर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी; शस्त्रक्रिया यशस्वी
नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये ब्लॉक असल्याचं दिसलं डॉक्टरांनी सांगितलं.
केंद्रीय सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) ही शस्त्रक्रिया पार पडली. सध्या नारायण राणे यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत रूग्णालयाकडून माहिती देण्यात आली आहे. नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये ब्लॉक असल्याचं दिसलं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना अॅन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.
Published on: May 27, 2022 03:14 PM