‘घरात घुसून एकेकाला मारून…’, नारायण राणे यांची मविआ कार्यकर्त्यांना थेट धमकी

| Updated on: Aug 28, 2024 | 3:00 PM

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकासाघाडीच्या नेत्यांनी मालवणमध्ये दाखल होत आज घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत हे राजकोट किल्ल्यावर हजर होते.

सिंधुदुर्गातील मालवण येथे असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आले असताना नारायण राणे हे त्यांचा मुलगा निलेश राणेंसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले त्यावेळी पोलिसांनी राणे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना किल्ल्याच्या पायथ्याशीच अडवलं. यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. या राड्यावर भाजप खासदार नारायण राणे आपली प्रतिक्रिया दिली. कोणीही घोषणाबाजी करायची नाही. पोलिसांना सहकार्य करा, पण यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांना असहकार्य असेल. त्यांना येऊ दे. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. तर परवानगी दिल्यानंतर मी एकेएकाला बघतो. घरात रात्रभर खेचून एकेकाला मारुन टाकेन. कोणालाही सोडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.

Published on: Aug 28, 2024 02:45 PM
‘फडणवीस स्वतःची जमीन, बंगला विकून पैसे देत नाही तर..’, ‘लाडकी बहीण’वरून जरांगे पाटलांनी डिवचलं
राजकोट किल्ल्यावर मविआ-भाजप कार्यकर्ते भिडले, राड्यात जयंत पाटलांची मध्यस्थी