Narayan Rane Live | आता लक्ष महाराष्ट्र सरकार, सगळ्यांना पुरुन उरलो : नारायण राणे

| Updated on: Dec 31, 2021 | 4:27 PM

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील विजय हा माझा नव्हे तर भाजपचा आहे. जिल्ह्यातील देवी-देवता आणि जनतेचा आहे. आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे आमचे लक्ष आहे, असे वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील मतमोजणीनंतर भाजपचा विजय घोषित झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील विजय हा माझा नव्हे तर भाजपचा आहे. जिल्ह्यातील देवी-देवता आणि जनतेचा आहे. आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे आमचे लक्ष आहे, असे वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील मतमोजणीनंतर भाजपचा विजय घोषित झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर तुमची सत्ता आली, यावर काय प्रतिक्रिया द्याल, असे विचारले असता, नारायण राणे म्हणाले, ‘ ही सत्ता माझी नाही. भाजपची सत्ता आली आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादाने ही सत्ता आली आहे. माझे कार्यकर्ते आणि नितेश राणेंनी घेतलेली मेहनत. राजन तेली आणि निलेश राणेंनी दिलेली साथ. यामुळे हा विजय मिळवला. हा विजय मिळवताना अक्कलेचा वापर झाला. अक्कल ज्याला आहे, त्याच्या ताब्यात देवदेतांनी बँक दिली आहे. नितेश आणि निलेशसह कार्यकर्त्यांना हे श्रेय आहे. सिंधुदुर्गाचा विजय हा आमच्या देवदेवतांनी मिळवलेला विजय आहे, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 31 December 2021
Narayan Rane | निवडणुकीसाठी अर्थमंत्री येतात, पराभूत होऊन जातात; अजित पवारांना टोला