टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला कुठं आलेत ‘अच्छे दिन’?, आतापर्यंतचा उच्चांकी बाजारभाव
VIDEO | यंदा कधी नव्हे तर टोमॅटोला मिळाला चांगला दर, शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण... नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलो च्या कॅरेटला 2700 रूपयांपर्यंतचा भाव
पुणे, ७ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीकं आडवी झाली होती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला चांगला बाजार भाव मिळत असून टोमॅटोचा हब असलेल्या नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलो च्या कॅरेटला 2700 रूपयांपर्यंतचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधान पाहायला मिळत आहे. सध्या काही प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभाव मात्र काहिसा कमी झाला आहे. याच बाजारसमितीत गेली शेकडो वर्षातील उच्चांकी 3500 रूपये कॅरेटला बाजारभाव शेतकऱ्य्रांना मिळाला आहे, या पुढच्या काळातही बाजार भाव असेच टिकून राहतील असा अंदाज शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Aug 07, 2023 01:02 PM