मुलगा गेल्याचं दुख पण तो आमच्या संपर्कात नव्हता, Prabhakar Sail च्या आईची प्रतिक्रिया
अचानक काय झाले माहीत नाही. काल त्यांची तब्येत ठीक नसल्याचा फोन आला आणि त्यांचे निधन झालं. इतर चौकशीबाबतही काहीच माहीती नाही. त्याला दोन मुली आहेत, त्यांचं कसं होणार माझा मुलगा तर गेला आत्ता काय बोलायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : प्रभाकर साईचा मृत्यू झाल्यानंतर आज प्रभाकरच्या आईच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. प्रभाकरशी आपलं बोलणं झालं होतं, पण अचानक काय झालं ते समजण्यापलीकडचं आहे. तो एकटाच राहत होता, एक दिवसापूर्वी संवाद झाला होता, त्यावेळी तो ठिक होता. मात्र अचानक काय झाले माहीत नाही. काल त्यांची तब्येत ठीक नसल्याचा फोन आला आणि त्यांचे निधन झालं. इतर चौकशीबाबतही काहीच माहीती नाही. त्याला दोन मुली आहेत, त्यांचं कसं होणार माझा मुलगा तर गेला आत्ता काय बोलायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.