PM Modi Meet | देशाला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका? पंतप्रधान मोदी आढावा घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारतानं कोणती काळजी घ्यावी आणि उपाययोजना करावी, यासंदर्भात तातडीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा आढावा घेतील. या बैठकीचं अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांच्याकडेच असेल. ही बैठक सकाळी 10.30 वाजता होणार आहे.