Modi 3.0 : मोदींची पंतप्रधानपदाची हॅट्रीक पण नव्या मंत्रिमंडळात ‘त्या’ 20 जुन्या मंत्र्यांची आठवणही नाही

| Updated on: Jun 09, 2024 | 5:01 PM

नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात जुन्या २० मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. या २० पैकी काही मंत्र्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तर काहीचा या नव्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान, भाजपाच्या कॅबिनेटमधून अनेक दिग्गज मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. बघा कोणते आहेत ते मंत्री?

Follow us on

नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सव्वा सात वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तर नरेंद्र मोदी यांच्यासोबत कॅबिनचे मंत्री देखील पद आणि गोपनियतेची शपथ ग्रहण करतील. यंदा भाजपला एकट्याला बहुमत मिळाले नसल्याने मोदींना एनडीएने मोठी साथ दिली आहे. त्यामुळे एनडीएच्या सहकाऱ्यांना देखील कॅबिनेटमध्ये जागा मिळणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात जुन्या २० मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. या २० पैकी काही मंत्र्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तर काहीचा या नव्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान, भाजपाच्या कॅबिनेटमधून अनेक दिग्गज मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. त्यामध्ये स्मृती इराणी, अनुराग ठाकुर, राजीव चंद्रशेखर, अजय मिश्रा टेनी, जनरल व्ही.के. सिंह, अश्विनी चौबे आणि नारायण राणे यांची नावे सामील आहेत. याच प्रकारे अजय भट्ट, साध्वी निरंजन ज्योती, मीनाक्षी लेखी, राजकुमार रंजन सिंह, आर.के.सिंह, अर्जून मुंडा, निशीथ प्रमाणिक, सुभाष सरकार, जॉन बारला, भारती पवार, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, भागवत कराड यांना देखील कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार नाही असे म्हटले जात आहे.