रायगडावर जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतायतं, अजित पवार गप्प का ? -नरेंद्र पाटील
रायगडावर जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतायतं, अजित पवार गप्प का ? -नरेंद्र पाटील
नवी मुंबई: नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. अजित पवार तुम्हीही उपमुख्यमंत्री आहात, आपण व्यक्तिशः माझे दादा आहात. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही शांत का? रायगडावर निघणाऱ्या मावळ्यांवर गुन्हा दाखल केले जात आहेत त्यांच्या गाड्या अडवल्या जातात हे कितपत योग्य आहे ? ओबीसी आणि इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजावर अन्याय होत असल्यास एकत्र येतात, मग आपले मंत्री काहीच का बोलत नाहीत, असा सवाल नरेंद्र पाटील यांनी विचारला. आता यावर अजित पवार काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.