‘मातोश्रीवरुन व्हिडीओ व्हायरल करण्याच्या थेट सूचना’, नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले
VIDEO | असे प्रकार घडणे गंभीर, राजकीय लढाई ही विचारांची असते अन्... नरेश म्हस्के यांनी स्पष्टच सांगितले
मुंबई : शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हीडिओ मॉर्फ करुन व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी शितल म्हात्रे यांनी संताप व्यक्त करत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के देखील होते. या पत्रकार परिषदेत नरेश म्हस्के यांनी काही नेते मातोश्रीवर बसून काही आमदार आणि खासदारांना व्हिडीओ पाठवून तो व्हायरल करण्याच्या सूचना देत होते, असा गंभीर आरोप केला. तसेच राजकीय लढाई ही विचारांची आणि तत्वांची असली पाहिजे असे म्हणत त्यांनी असे प्रकार घडणे गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. तर जी स्त्री आपल्या विचारांनी, तत्त्वांनी राजकीय विरोध करत असते तिला उत्तर देता येत नाही म्हणून अशा प्रकारे तिची निंदानालस्ती करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.
Published on: Mar 12, 2023 10:57 PM