‘माझा माझ्या म्हातारीवर विश्वास, मुलगा मला…’, नरहरी झिरवळ नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Aug 02, 2024 | 5:09 PM

. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात गोकुळ झिरवळ यांनी हजेरी लावली आणि राजकीय वर्तुळात झिरवळ पिता-पुत्रांच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, नरहरी झिरवळ यांनी आपल्या मुलाबद्दल अजित पवारांसमोर स्पष्ट सांगितले

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले नरहरी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ झिरवळ हे चांगलेच चर्चेत आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यात गोकुळ झिरवळ यांनी हजेरी लावली आणि राजकीय वर्तुळात झिरवळ पिता-पुत्रांच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, नरहरी झिरवळ यांनी आपल्या मुलाबद्दल अजित पवारांसमोर स्पष्ट सांगितले. कोणी काहीही बोलले तरी लक्ष देऊ नका. माझा म्हातारीवर विश्वास, मुलगा मला सोडून जाणार नाही. माझा मुलगा माझा आहे. त्याला आमदार व्हायचे असेल तर मी दादांना सांगेल त्याला आमदार करा. त्याच्याविषयी बातम्या सुरू आहे. पण तो आता दादांनी दिलेल्या फ्लॅटवर मुंबईमध्ये काम करतोय, असे स्पष्टीकरण नरहरी झिरवळ यांनी दिले आहे. आज अजित पवारांच्या उपस्थितीत आमदार नितीन पवार यांच्या कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात 736 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नरहरी झिरवळ उपस्थित होते.

Published on: Aug 02, 2024 05:09 PM
चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता? शिंदे, पवार, ठाकरे, फडणवीसांच्या..; कोणी केलं अजब वक्तव्य
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांना समाधान; म्हणाल्या, शेठने सुरू केलेली योजना…