Nashik | नाशिकमध्ये अमित ठाकरेंनी मैदानात लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद
अमित ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज अमित ठाकरे यांनी नाशिकमधील काही तरुणांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्यानंतर अमित ठाकरे हे देखील नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अमित ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज अमित ठाकरे यांनी नाशिकमधील काही तरुणांसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी काही गोलही केल्याचं पाहायला मिळालं.