उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंवर गुन्हा का नाही? नाशिकमध्ये भाजप नेते आक्रमक
भाजपच शिष्टमंडळ पोलीस आयुक्त दीपक पांडेंच्या भेटीला गेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामना संपादक रश्मी ठाकरे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रार अर्जावरून अद्याप गुन्हे दाखल का नाही, अशी विचारणा शिष्टमंडळ करणार आहे.
भाजपच शिष्टमंडळ पोलीस आयुक्त दीपक पांडेंच्या भेटीला गेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामना संपादक रश्मी ठाकरे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रार अर्जावरून अद्याप गुन्हे दाखल का नाही, अशी विचारणा शिष्टमंडळ करणार आहे. तसेच 48 तास उलटूनही भाजप कार्यलय फोडणाऱ्यांना अटक न झाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार देवयानी फरांदे,आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे,शहराध्यक्ष गिरीश पालवे ही उपस्थित आहेत. आयुक्तांच्या भेटीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. नारायण राणे यांच्या अटकेच्या दिवशी नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. तर, भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.