नाशिककरांची चिंता वाढली… पुरपरिस्थिती अन् गोदावरीला पहिला पूर, दूतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी

| Updated on: Aug 05, 2024 | 12:56 PM

मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला हंगामातील पहिला पूर आला आहे. गोदा घाट परिसरातील दूतोंडा मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी सध्या बघायला मिळत आहे. मात्र सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदा घाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलाय

Follow us on

नाशिकमध्ये गेल्या 24 तासात 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरीला हंगामातील पहिला पूर आला आहे. गोदा घाट परिसरातील दूतोंडा मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी सध्या बघायला मिळत आहे. मात्र सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदा घाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस असताना मात्र गोदा आरतीतही कोणताही खंड पडला नाही. रामकुंड परिसरात शेकडो वर्षांपासून पुरोहित संघाच्या वतीने गोदा आरती केली जाते. ऊन, वारा, पाऊस कसलीही तमा न बाळगता अखंडपणे ही गोदा आरती भाविकांच्या हातून दररोज संध्याकाळी केली जात आहे. नाशिकमध्ये गोदावरीला सध्या पूर आला असला, तरी पाण्याची पातळी वाढलेली असताना देखील गोदावरीच्या आरतीमधे खंड पडला नसल्याचे पाहायला मिळत आहे. गुडघाभर पाण्यात उभे राहून पुरोहित संघाच्या पुरोहितांनी गोदा आरती पार केली. हा अलौकिक सोहळा यावेळी उपस्थित असलेल्या शेकडो भाविकांनी गोदा तटावर उभ राहून अनुभवला असल्याचे पाहायला मिळाले.