‘मला चर्चेला बोलावलं तर नाराजी दूर होईल पण…’, सत्यजित तांबे कुणावर नाराज?

| Updated on: Apr 18, 2023 | 7:26 AM

VIDEO | नाशिकचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे नेमके कुणावर नाराज? भूमिका स्पष्ट करत राजकीय घडामोडीवर काय केलं मोठं वक्तव्य

नाशिक : नाशिकचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून विजय सुद्धा मिळवला. त्यावेळी पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केलं. काँग्रेसने त्यांच्याबाबत घेतलेल्या या भूमिकेमुळे सत्यजित तांबे अजूनही नाराज असल्याचे दिसून येत आहे. याबाबत स्वतः त्यांनी कराड येथे आज आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय घडामोडीवर मोठे विधान केले आहे. सत्यजित तांबे यांनी साताऱ्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी शासकीय विश्रामगृहात चर्चा केल्यानंतर आज कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास भेट देत अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सत्यजित तांबे म्हणाले की, माझे कोणाशी मतभेद नाहीत. त्यामुळे ते दूर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझी नाराजी तेव्हाच दूर होईल जेव्हा मला कोण चर्चेला बोलवेल. मला जर चर्चेलाच बोलावलं नसेल तर माझी नाराजी दूर कशी होईल?, असे म्हणत त्यांनी सवालही उपस्थित केला आहे.

Published on: Apr 18, 2023 07:26 AM
बळीराजा अडचणीत! १० कोटींची फसवणूक; शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आमने-सामने
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला धक्का, शरद पवार यांच्या संघटनेची मान्यता रद्द