शांतिगिरी महाराज भाजपमध्ये जाणार? नरेंद्र मोदींचा करणार प्रचार; म्हणाले मोदी माझे…

| Updated on: May 24, 2024 | 2:32 PM

नरेंद्र मोदी माझे राजकारणातील आदर्श आहेत, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना शांतिगिरी महाराज यांनी देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवणे गरजेचे असल्याचे म्हटले

नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी शांतिगिरी महाराज वाराणसीला जाणार आहेत. नरेंद्र मोदी माझे राजकारणातील आदर्श आहेत, असं वक्तव्य शांतिगिरी महाराज यांनी केलं. तर भाजपमध्ये जायचं की नाही हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठरवणार असल्याचं मोठं वक्तव्यदेखील शांतिगिरी महाराज यांनी केलं. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना शांतिगिरी महाराज यांनी असे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले राजकारणातले आदर्श असून आपण त्यांच्यासाठी प्रचाराला वाराणसीला जाणार आहे. तर आपण अपक्ष निवडणूक लढवणार हा आपला स्वतःचा निर्णय जरी असला तरी देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवणे गरजेचे असल्याचे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले.

Published on: May 24, 2024 12:23 PM
पबचं बील 48 हजार, 12 वी पासच्या पार्टीनं केला घात, दारूच नाहीतर ड्रग्सचीही नशा?
अरे तुझ्या घरच्या लाट ना पोळ्या पहिल्यांदा… अडसूळांचा नवनीत राणांवर निशाणा, काय केली टीका?