Nashik Lok Sabha Constituency Result 2024 : शिंदे गटाला धक्का, ठाकरे गटाचा उमेदवार आघाडीवर, विजयापूर्वीच उधळला गुलाल
भाजपकडून हेमंत गोडसे यांनी तिकीट देण्यासाठी नकार देण्यात आला होता. मात्र त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र तेच हेमतं गोडसे आता पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेना विरूद्ध शिवसेना असा लोकसभेचा सामना झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमध्ये मविआ आणि महायुतीकडून उमेदवार देण्यापूर्वी हा मतदारसंघ बराच चर्चेत राहिला होता. याच ठिकाणी भाजपकडून हेमंत गोडसे यांनी तिकीट देण्यासाठी नकार देण्यात आला होता. मात्र त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र तेच हेमतं गोडसे आता पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्यामुळे हेमंक गोडसे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. राजाभाऊ वाजे हे आघाडीवर असल्याने त्यांच्या विजयापूर्वीच त्यांच्या कार्यकर्त्यांनी होम ग्राऊंड सिन्नरमध्ये गुलाल उधळत जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी वाजे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील केली.
Published on: Jun 04, 2024 12:47 PM