छगन भुजबळांकडून शरद पवारांच्या ‘तुतारी’चा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
महायुतीचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार गटाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत आहेत. इतकंच नाही तर छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये फिरतात आणि भंगरे यांच्यासोबत फिरतात, एकनाथ शिंदे गटाचे आमदारानं केला गंभीर आरोप, बघा काय म्हणाले?
महायुतीचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार गटाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. सुहास कांदे मेळाव्यात बोलत असताना त्यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. तर छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये फिरतात आणि भंगरे यांच्यासोबत फिरतात, असा आरोपही सुहास कांदे यांनी केला आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ हे स्वतः नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते इतकंच नाहीतर शेवटपर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या चर्चांवर प्रतिक्रिया देत त्यावेळी छगन भुजबळ यांनी पुर्णविराम दिला होता. अशातच सुहास कांदे यांनी भर मेळाव्यातील सभेत भुजबळांवर आरोप केलाय.