उद्धव ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

| Updated on: May 06, 2024 | 5:01 PM

ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विजय करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर व्यक्त केली नाराजी

नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विजय करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. विजय करंजकर हे नाशिकमधून उद्धव ठाकरे गटाकूडन निवडणूक लढण्यास इच्छुक होते. पण उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिल्याने विजय करंजकर हे नाराज होते. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर विजय करंजकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, म्हणाले, ‘वर्षभरापासून संपूर्ण लोकसभा मतदारसंघ फिरून मी प्रचार प्रसार केला. असं असताना वेळेवर जे इच्छुक नव्हते त्यांना तिकीट दिलं आणि माझ्याशी विश्वासघात गद्दारी केली. गद्दार कोण हे येणारा काळ दाखवून देईल. पडद्याआड लपलेले जे आहे ते गद्दार आहे, त्यांचा निषेध करतो’, असं त्यांनी म्हटलं.

Published on: May 06, 2024 05:01 PM
बारामतीतील मतदानाच्या एक दिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते…, फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात