नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीत अद्वय हिरे आणि दादा भुसे यांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?

| Updated on: Apr 29, 2023 | 11:13 AM

VIDEO | नाशिकच्या मालेगाव बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष, अद्वय हिरे आणि दादा भुसे यांच्यात चुरशीची लढत

नाशिक : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या मालेगाव बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज महाविकास आघाडीचे नेते ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी मतदानाचा हक्क बजावला .हिरे स्वतः सोसायटी गटातून उमेववारी करताहेत. जनतेची साथ मोठी आहे.सर्वसामान्य मतदार आमच्या सोबत आहे.दडपशाही व दादगिरीला मतदार भीक घालणार नाही मतदारांमध्ये चांगला उत्साह आहे.मालेगावमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सर्व जागांवर विजयी होतील व जिल्ह्यातही महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल अशी आशा अद्वय हिरे यांनी मतदानानंतर व्यक्त केले. मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे व ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पॅनेलमध्ये चुरशीची लढत आहे. तर नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी भवन येथे एकूण दहा टेबलवर मतमोजणी होत आहे. काल शांततेच्या वातावरणात एकूण 97.6% मतदान झाले. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Published on: Apr 29, 2023 11:13 AM