VIDEO : भोंग्यांवरुन MNS चे मुस्लीम नगरसेवक अडचणीत, Viral Audio Clip ऐका

VIDEO : भोंग्यांवरुन MNS चे मुस्लीम नगरसेवक अडचणीत, Viral Audio Clip ऐका

| Updated on: Apr 07, 2022 | 3:39 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरून भोंगे हटवले नाही तर हनुमान चालिसा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच नाराजी पसरली आहे. ज्या मनसे नेत्यांचा मतदारसंघ मुस्लि बहूल आहेत, त्या भागातील मनसे नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे. तर मनसेच्या मुस्लिम नगरसेवकांचीही या मुद्द्यावरून अडचण झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरून भोंगे हटवले नाही तर हनुमान चालिसा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच नाराजी पसरली आहे. ज्या मनसे नेत्यांचा मतदारसंघ मुस्लि बहूल आहेत, त्या भागातील मनसे नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे. तर मनसेच्या मुस्लिम नगरसेवकांचीही या मुद्द्यावरून अडचण झाली आहे. राज ठाकरेंच्या भोंगे काढण्याच्या भूमिकेला समर्थन देणारे मनसे नगरसेवक सलीम शेख यांच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. सलीम शेख यांना एका मुस्लिम युवकाने फोन करून या प्रश्नी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. या मुस्लिम युवकाची आलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ‘तुम्ही मुस्लिम असूच शकत नाही, DNA टेस्ट करून घ्या’ असा अजब सल्लाच या तरुणाने सलीम शेख यांना दिला आहे.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 7 April 2022
VIDEO : मनसेची, Raj Thackeray यांची साथ सोडणार नाही -Vasant More