Hemant Godse | नाशिकमधील खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. गोडसे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. मुंबईला जाऊन आल्यानंतर सर्दी,खोकला आणि ताप आल्यानंतर हेमंत गोडसे यांनी चाचणी केली होती.
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. गोडसे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. मुंबईला जाऊन आल्यानंतर सर्दी,खोकला आणि ताप आल्यानंतर हेमंत गोडसे यांनी चाचणी केली होती. हेमंत गोडसे यांना यापूर्वी देखील कोरोना झाला होता. संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन हेमंत गोडसे यांनी केलं आहे. नाशिक शहरातील सर्व कोव्हिडं सेंटर 4 दिवसात सुरू करा, असे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले आहेत. शाळा बंद करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश देखील महापौरांनी दिले आहेत. शहरातील एकही डोस न घेतलेल्या 1 लाख नागरिकांना सर्वाधिक धोका असल्याचं समोर आलंय.