हवालदिल झालेल्या शेतकऱ्याचा संताप अनावर, टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकले; पण का?

| Updated on: May 15, 2023 | 3:37 PM

VIDEO | कांदे पाठोपाठ टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक, अक्षरशः टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून व्यक्त केला संताप

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटने बळीराजा चिंतेत होता. आता कुठं अवकाळी पावसाने उसंत घेतली असली तरी नाशिक जिल्ह्यात शेतकरी मात्र हवालदिल दिसतोय. कांदे पाठोपाठ टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाल्याने त्यानं टोकाचं पाऊल उचलंलं आहे. कांदे पाठोपाठ टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाडसह काही ग्रामीण भागात टोमॅटोला प्रति किलो 2 ते अडीच रुपये इतकाच भाव मिळत आहे. सध्या टोमॅटोला जो भाव मिळत आहे त्यातून मजूरी आणि वाहतुकीवर केलेला खर्च देखील निघत नसल्याचे पाहून दिंडोरीच्या करंजवन या गावातील जनाबाई खरात या हवालदिल झालेल्या महिला शेतकरीने अक्षरशः टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून संताप व्यक्त केला आहे. बघा काय व्यक्त केली प्रतिक्रिया

Published on: May 15, 2023 03:37 PM
Lok Sabha Elections : कर्नाटक निवडणूक होताच अजित पवार यांनी कोणते दिले संकेत? भाजपकडून खंडन; काय आहे प्रकरण?
‘लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात दंगली घडवण्याचा डाव’, खैरे यांचा खळबळजनक दावा