नाशिक-पुणे महामार्ग आहे की वाळवंट? काही कळेनाच… जीव मुठीत धरून प्रवासी करताय प्रवास
VIDEO | नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर गावाजवळ खड्ड्यांचं साम्राज्य, मोठाल्या खड्ड्यातून प्रवास करणाऱ्यांना होतोय मनस्ताप, बघा व्हिडीओ
नाशिक, २९ जुलै २०२३ | बुलेट ट्रेनच्या बाता मारणाऱ्या राज्य सरकारला साधं नाशिक-मुंबई ररस्त्याचं काम देखील अद्याप पूर्ण करता आलेलं नाही. मोठाली आश्वासनं देणाऱ्या सरकारनं नाशिक पुणेदरम्यान, बुलेट ट्रेन सुरू करू अशी स्वप्न दाखवून वल्गना केली होती. प्रत्यक्ष मात्र पुणेकर आणि नाशिकच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांऐवजी नाशिक मधील नेतेमंडळी सध्या रेल्वेने प्रवास करणं पसंत करत असले तरी नाशिककरांना मात्र दररोज महामार्गावरील मोठाल्या खड्ड्यांमधून वाहतूक कोंडीत अडकत जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.. नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर गावाजवळ पडलेल्या प्रचंड मोठ्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल आहेत. याच नाशिककरांनी आता सरकारला हाय स्पीड आणि बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवण्याऐवजी किमान रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा केली आहे. इतकेच नाही तर आता नाशिक सिन्नर दरम्यान प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून कसा प्रवास करावा लागतोय, बघा व्हिडीओ…