Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना राज्यात मोठं मंत्रिपद मिळणार? ‘त्या’ कोटवरून का होतेय चर्चा?

| Updated on: Dec 03, 2024 | 2:41 PM

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ हे देखील नव्या सरकारमध्ये मंत्री असतील, अशी जोरदार चर्चा होताना दिसत आहे. छगन भुजबळ यांना राज्यात मोठं मंत्रिपद मिळणार का? सध्या यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू असून नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या कोटची देखील चर्चा

येत्या गुरूवारी ५ डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. हा सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. अशातच पुन्हा मंत्रिपदी कोणा-कोणाची वर्णी लागणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ हे देखील नव्या सरकारमध्ये मंत्री असतील, अशी जोरदार चर्चा होताना दिसत आहे. छगन भुजबळ यांना राज्यात मोठं मंत्रिपद मिळणार का? सध्या यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू असून नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या कोटची देखील चांगलीच चर्चा होताना दिसतेय. दरम्यान, यावर स्वतः छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. छगन भुजबळ यांनी आज घेतलेल्या कोटावर मुश्किल टिप्पणी करत असे म्हटले की, मंत्रिमंडळ नाही तर नाशिकच्या थंडीमुळे कोट घातला आहे. नाशिकपासून पुढे गेल्यानंतर कोट काढून टाकणार आहे, असं छगन भुजबळांनी म्हटलंय. इतकंच नाहीतर सुरू असलेल्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. तर महायुती सरकारमध्ये जास्त मंत्रिपदं कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार? असा सवाल भुजबळांना केला असात यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मला काही कल्पना नाही. अजित पवारांसोबत आमची बैठक झाली. तेव्हा स्टाईकरेट बाबत विषय झाला. एक नंबर भाजप असल्याचे त्यांनी म्हटले.

Published on: Dec 03, 2024 02:41 PM