Nashik | हेल्मेट न घालणाऱ्या 72 चालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव
नाशिकमध्ये "नो हेल्मेट, नो पेट्रोल" मोहीम अधिक तीव्र करण्याचा पोलीस आयुक्तांनी इशारा दिलाय तर आता पेट्रोल पंपावर हेल्मेट असल्याचा खोटा दावा करणाऱ्या वाहन चालकांवर वेगळ्या पद्धतीने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
नाशिकमध्ये “नो हेल्मेट, नो पेट्रोल” मोहीम अधिक तीव्र करण्याचा पोलीस आयुक्तांनी इशारा दिलाय तर आता पेट्रोल पंपावर हेल्मेट असल्याचा खोटा दावा करणाऱ्या वाहन चालकांवर वेगळ्या पद्धतीने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 72 चालकांच्या लायसन्स निलंबनाचा प्रस्ताव पोलिसांनी परिवहन विभागाला दिला आहे. त्यामुळे आता वाहन चालकांना हेल्मेट बाबतची उडवा उडवीची उत्तर ही चांगलीच महागात पडणार आहेत.