Nashik School : नाशिकमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय 10 डिसेंबरनंतर होणार

| Updated on: Nov 30, 2021 | 1:37 PM

महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णयात जारी केलेल्या नियमावलीचं पालन होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

नाशिक मधील साहित्यसंमेलनात लसीकरणाशिवाय प्रवेश नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत. आता साहित्य संमेलनाच्या (Sahitya Sammelan) शेजारी चक्क लसीकरणाचा (Vaccination) मांडव टाकण्यात येणार आहे. संमेलनस्थळी मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णयात जारी केलेल्या नियमावलीचं पालन होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. नाशिकमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.