Nashik Special Report | लसीचे दोन डोस घेलत्यावर खरंच अंगाला धातू चिकटतात का?
नाणी शरीरावर चिकटणे हा 0 प्रयोग कोणीही माणूस करून पाहू शकतो. नाणे, उलथन जरासे ओले करून घ्या आणि पोट, दंड, पाठ अशा सपाट भागावर हलकेसे दाबून ठेवा. निर्वात पोकळी निर्माण होऊन जरावेळ अशी वस्तू चिकटून राहते. पाणी सुकले की मात्र पडते, असं महाराष्ट्र अंनिसकडून सांगण्यात आलं आहे.
कोरोनाची दुसरी लस घेतल्यानंतर अरविंद सोनार यांच्या हाताला नाणी, चमचे चिकटत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. अरविंद सोनार यांनी या प्रकरणी कोणत्याही प्रकारच्या तपासणीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं देखील म्हटलं होतं. सोनार यांच्या हाताला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा वरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं अरविंद सोनार यांच्या शरीरावर नाणी, चमचे आणि स्टील वस्तू का चिकटत आहेत यामागील कारण सांगितलं आहे.