त्र्यंबकेश्वर, पाहिने, भावलीमध्ये पर्यटकांची गर्दी, नागरिकांना कोरोना नियमांचा विसर

| Updated on: Jul 26, 2021 | 10:25 AM

त्र्यंबकेश्वर, पाहिने, भावली वॉटर फॉल वर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. पोलिस यंत्रणेकडून मात्र पर्यटन स्थळांवर दुर्लक्ष होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर कोरोनासंबंधी नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. त्र्यंबकेश्वर, पाहिने, भावली वॉटर फॉल वर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. पोलिस यंत्रणेकडून मात्र पर्यटन स्थळांवर दुर्लक्ष होताना दिसत आहे. नागरिकांना कोरोना नियमांचा विसर आणि पोलीस यंत्रणा बेअसर अशी परिस्थिती असल्याचं चित्र आहे.

Published on: Jul 26, 2021 10:23 AM
महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे कोरोनामुळे निधन
गुजरातमध्ये बघता बघता कार नाल्यात वाहून गेली, दृश्यं कॅमेरात कैद