मालेगावात पाणी टंचाईच्या झळा, ‘या’ गावातील ग्रामस्थांची टँकरखाली ओंजळ
VIDEO | वाढत्या उन्हाबरोबरच पाणी टंचाईच्या तीव्र झळा, कोणत्या गावात पाणी टंचाईचे भीषण वास्तव
नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बळीराजाचं अतोनात हाल झालं आहे. एकीकडे हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे बळीराजा हवादिल झाला आहे. तर आता दुसरीकडे राज्यातील नाशिक जिल्ह्याच्या मालेगावात वाढत्या उन्हाबरोबरच पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. कजवाडे, सावकारवाडी, वऱ्हाणे, वऱ्हाणेपाडा आणि मेहुणे, झाडी या पाच गावांना सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात आहे. तर शासकीय टँकर गावातील विहिरीत खाली करून त्या विहिरीच्या मार्फत नळाने या टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांपाठोपाठ जळगाव निंबायती, ज्वार्डी, बुद्रुक, कंधाने, एरंडगाव या गावांचीही टँकरची मागणी वाढल्याने मालेगावमध्ये पुढील काळात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.