भाजपनं जनतेला एप्रिल फूल बनवलं, राष्ट्रवादीच्या नेत्याचा वज्रमूठ सभेतून हल्लाबोल

| Updated on: Apr 02, 2023 | 9:15 PM

VIDEO | 'हे सरकार धास्तवलंय, जिथे वज्रमूठ सभा होणार तिथे त्यांची कोणती न् कोणती यात्रा निघणार', राष्ट्रवादीच्या नेत्याची खोचक टीका

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होत आहे या सभेत महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, तर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला नुकताच काल एक एप्रिल म्हणजेच एप्रिल फुल हा दिवस झाला भाजपचा स्थापना दिवस आहे पण 2014 मध्ये सत्ता आल्यापासून देशात आणि राज्यात जनतेला भाजपने एप्रिल फुल बनवला आहे गेल्या दहा वर्षापासून भाजपकडून जनतेची चेष्टा सुरू असून त्यामुळे भाजपचा वर्धापन दिन एक एप्रिल रोजी जनता साजरा करेल, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे. त्या अर्थसंकल्पाला पंचामृत हे नाव दिले आहे. मात्र या अर्थसंकल्पामध्येच देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिल फूल केले आहे असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

Published on: Apr 02, 2023 09:15 PM
मुख्यमंत्र्यांनी ‘मविआ’च्या सभेवर एकाच वाक्यात केलं भाष्य; म्हणाले, ‘ही सभा वज्रमूठ नव्हे तर…’
तेव्हा दातखीळ बसली होती का?, अजित पवार यांनी आक्रमक होत सरकारला विचारला जाब