शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, पहिल्याच बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे ठराव
VIDEO | शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्य नेतेपदी कायम ठेवण्यात आले असून पक्षाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना असणार आहेत. यासोबत राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत महत्वाचे ठरावही करण्यात आले. या ठरावाची माहिती देताना उदय सामंत म्हणाले, आज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असेल याबद्दल ठराव झाले.
Published on: Feb 21, 2023 10:28 PM