National Film Awards 2023 Allu Arjun : पुष्पासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता अन् लोकांच्या हृदयावर राज्य करणारा अल्लू अर्जुन याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुष्पा या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान देण्यात आलाय
नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर, २०२३ | साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपर हिरो आणि लोकांच्या हृदयावर राज्य करणारा अल्लू अर्जुन याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2021 साली अल्लू अर्जुनचा रिलीज झालेल्या पुष्पा चित्रपटाद्वारे सर्वत्र प्रसिद्ध झाला. आता या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अल्लू अर्जुनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अल्लू अर्जुन हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. जिथे देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेत. 24 ऑगस्ट रोजी विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली, त्यानंतर आज या सर्वांचा गौरव करण्यात आला.