Ratan Tata : अनमोल ‘रत्न’ हरपला… सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला

| Updated on: Oct 11, 2024 | 11:01 AM

उद्योगपती नावाचा खरा अर्थ सार्थ करणारे रतन टाटा अनंतात विलीन झालेत. झोपडपट्टी, चाळीत राहणाऱ्या माणसांपासून ते अगगदी टोलेजंग इमारतीतील नोकरदार किंवा व्यवसायिकानं टाटांच्या निधनाने शोक व्यक्त केला.

Follow us on

रतन टाटांच्या निधनाने एक संवेदनशील उद्योगपती आणि चांगला माणूस गेला. हीच भावना सर्वसामान्यांपासून बड्या व्यक्तीची आहे. खरंतर एका उद्योगपतीच्या निधनाने सर्वसामान्य हळहळावे तसं दुर्मिळच चित्र पण टाटा घराण्याची पुण्याई, उपभोगशून्य भावनेने वटवृक्षांपर्यंत वाढलेला उद्योग, त्या वटवृक्षाने हजारो, लाखोंना दिलेला आधार आणि आकाश ठेंगणं वाटणाऱ्या उंचीवर पोहोचूनही मूळ जमिनीशी घट्ट ठेवणारे रतन टाटा… हेच ते सर्वसामान्यांच्या हळहळण्यामधलं मर्म होतं. टाटा कपंनीचा विस्तार सांगायचा झालं तर, एरोस्पेस, धातू, इन्फ्रा, पर्यटन, रिटेल, तंत्रज्ञान, पदार्थ, फॅशन, मीडिया, वाहनं आणि फायनान्स… हा उद्योग विस्तार एक दिवसात नव्हे तर तब्बल दिडशे वर्षाचा झाला. हल्ली रक्ताचे वारस संपत्ती टिकवतील का? याची शाश्वती नाही पण टाटा घराण्यात अनेक दत्तक पुत्रांनी वाडवडिलांनी कमावलेली दौलत टिकवली इतकंच नाहीतर ती अधिक संपन्नही केली. कशी होती टाटा घराण्याची वंशावळ बघा स्पेशल रिपोर्ट….