कोकणातील निसर्गाच्या सौंदर्याची भुरळ प्राण्यांनाही… भातशेतात मोर-लांडोरचा मनमुराद संचार
रत्नागिरी, कोकणातल्या निसर्गाची भुरळ केवळ पर्यटकांनाच नाहीतर आता प्राण्यांना देखील पडली आहे. कारण रत्नागिरीतल्या भात शेतामध्ये मोरा आणि लांडोर यांचे आगमन होताना दिसतंय.रत्नागिरीतील साखरपा जवळच्या शेतात मोरांसह लांडोरांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे.
कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते कोकण किनारपट्टी, कोकणाचे अथांग पसरलेले समुद्र आणि पावसाळ्यात हिरवाईने नटलेलं कोकणाचं सौंदर्य… पावसाळ्या कोकणात पर्यटनासाठी पर्यटकांचा अथिक कल असल्याचे पाहायला मिळते. विकेंडला कोकणातील सर्वच किनारपट्ट्या या पर्यटकांनी गजबलेल्या दिसतात. अशातच पावसाळा सुरू असल्याने कोकणातील सर्वच कडे कपाऱ्यातील लहान मोठे धबधबे प्रवाहित झाल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी, कोकणातल्या निसर्गाची भुरळ केवळ पर्यटकांनाच नाहीतर आता प्राण्यांना देखील पडली आहे. कारण रत्नागिरीतल्या भात शेतामध्ये मोरा आणि लांडोर यांचे आगमन होताना दिसतंय.रत्नागिरीतील साखरपा जवळच्या शेतात मोरांसह लांडोरांचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. टीव्ही 9 च्या कॅमेऱ्यात भात शेतात बागडताना मोर आणि लांडोर कैद झालेत.. बघा व्हिडीओ
Published on: Jul 13, 2024 05:52 PM