नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे सिडको घेराव आंदोलन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज (24 जून) सिडको घेराव आंदोलन करणार आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज (24 जून) सिडको घेराव आंदोलन करणार आहे. यावेळी तब्बल एक लाखांहून अधिक जण यात सहभागी होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.(Navi Mumbai airport naming controversy CIDCO Gherao Protest)