नवी मुंबई मेट्रो सेवा सुरु, पाहा काय आहेत नवीमुंबईकरांच्या प्रतिक्रिया

| Updated on: Dec 28, 2023 | 1:20 PM

नवी मुंबईतील बेलापूर ते पेंढार या मेट्रो सेवेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. नवी मुंबईकरांमध्ये याची उत्सूकता दिसून येत आहे. 12 वर्षांनी मेट्रोचं स्वप्न पूर्ण झाले आहे. मेट्रो प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज नवी मुंबईकरांना मेट्रोचा प्रवास सुरु झाला आहे. कोणत्याही औपचारिक उद्घाटनाशिवाय ही मेट्रो सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बेलापूर ते पेंढारपर्यंत ही मेट्रो धावणार आहे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदे आणि सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर यांच्यात बैठक झाली, त्यात बेलापूर ते पेंढार या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेकवेळा मेट्रोचे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते. मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतीक्षा होती, परंतु त्यांचा वेळ न मिळू शकल्याने मुख्यमंत्र्यांनी मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. बेलापूर ते पेंढर या 11.10 किमी लांबीच्या मार्गावर 11 स्थानके आहेत. तळोजा येथील पंचनंद येथे डेपो तयार करण्यात आला आहे. दर 15 मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध असणार आहे.

Published on: Nov 17, 2023 11:47 PM