Navi Mumbai | डोनेशन घेणाऱ्या Apeejay शाळेला Bachchu Kadu चा दणका, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

| Updated on: Jul 30, 2021 | 8:10 PM

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी शाळेची चौकशी करून डोनेशन प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

नेरूळ येथील Apeejay स्कूल प्राचार्य आणि संस्था चालक यांनी पालकाकडून शाळा प्रवेशासाठी 1,22,201 रुपयांचा डीडी आणि 6457 रुपये ऑनलाईन घेतल्याची तक्रार पालकांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली, या तक्रारीनुसार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंनी शाळेची चौकशी करून डोनेशन प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिलेत. The Maharashtra Educational Institutions(Prohibition of Capitation Fee) Act 1987 अंतर्गत अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत शाळा प्रवेशासाठी डोनेशन घेणे फौजदारी गुन्हा आहे. पालक अजय तापकीर यांनी त्याची मुलगी कथा तापकीर हिच्या शाळा प्रवेशावेळी दिलेला डीडी आणि ऑनलाईन पेमेंट याची झेरॉक्स पुरावा म्हणून जोडला.

Anil Deshmukh | अनिल देशमुख, ऋषिकेश देशमुखांना ईडीचा समन्स, 2 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश
Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मागण्या हायकोर्टाने फेटाळल्या